गुन्हेजळगाव शहर

‘ते’ अर्भक निघाले प्लास्टिकचे, पोलिसांनी केली खात्री

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२१ । शहरातील तांबापुरा येथे असणाऱ्या वखारीजवळ मोकळ्या जागी मंगळवारी सायंकाळी काही अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खात्री केली असून ते अर्भक प्लास्टिकचे असल्याची माहिती दिली आहे. अर्भक प्लास्टिकचे निघाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

मंगळवारी सायंकाळी दोन मोठे आणि इतर काही लहान अर्भक ईच्छादेवी चौफुलीजवळील वखारलगत असलेल्या मोकळ्या जागी मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच काही क्षणातच येथे मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला. मात्र जाणकरांनी प्रथमदर्शनी हे मृत अर्भक प्लास्टीक वा रबराचे असल्याचा संशय व्यक्त केला. तर बऱ्याच जणांना हे अर्भक खरे वाटत होते. अखेर एमआयडीसी पोलीस स्थानकाचे निरिक्षक प्रताप शिकारे यांनी घटनास्थळ गाठून प्रत्यक्षात तपासणी केली असता हे दोन्ही अर्भक प्लास्टीकचे असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी तपास केला असता एका भंगार व्यावसायिकाने एका मुलाला हे दोन्ही प्लास्टीकचे अर्भक फेकून देण्यासाठी पाठविले होते. मात्र हे खरे अर्भक असल्याची अफवा पसरल्याने त्याने स्वत: पोलिसांना याबाबतची माहिती दिली. दरम्यान, या प्रकारामुळे मात्र काही तासांपर्यंत जळगाव शहरात मृत अर्भके आढळून आल्याची अफवा पसरली होती.

दरम्यान, अर्भक प्लास्टिकची होती आणि ती वैद्यकीयशास्त्राचा अभ्यास करताना प्रसूतीशास्त्र तज्ञ ते अभ्यासासाठी प्रात्यक्षिक करताना वापरतात असे निरीक्षक शिकारे यांनी सांगितले. पोलिसांच्या खुलाशानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Check Also
Close
Back to top button