जळगाव जिल्हा

चैतन्य तांडा येथे लसीकरण शिबिराचे आयोजन!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२१। तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने वारंवार केलेल्या मागणीनुसार कोव्हीशिल्ड लसीचा साठा मंगळवार रोजी सकाळी उपलब्ध झाल्याने यावेळी एकूण चाळीस जणांचे लसीकरण करण्यात आले.
तालुक्यातील चैतन्य तांडा क्र. ४ ग्रामपंचायतीने वारंवार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे लसीचा साठा उपलब्ध करून देण्याविषयी मागणी केल्या. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लांडे यांच्या सहकार्याने कोव्हीशिल्ड लसीचा ४० डोस मंगळवार रोजी उपलब्ध झाला. त्याअनुषंगाने तांड्यातील 18 ते 44 या वयोगटातील एकूण ४० लाभार्थ्यांना कोव्हीशिल्ड लसीकरण करण्यात आले. यावेळी दुसऱ्यांदा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले. सदर शिबिराचे आयोजन हे ग्रामपंचायत येथे सकाळी १० वाजताच्या सुमारास करण्यात आले. सदर शिबिर आयोजित करण्यासाठी डॉ. राजपूत यांचे अनमोल सहकार्य लाभले. यावेळी कोरोणा समितीचे अध्यक्ष व लोकनियुक्त सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, वसंत राठोड, प्रवीण चव्हाण, संदीप पवार, साईनाथ राठोड, आरोग्यसेविका गांगुर्डे, आरोग्य सेवक डॉ, संदीप पाटील, उषा पवार, मदतनीस शोभा राठोड, डॉ. घनश्याम राठोड, आशा सेविका कविता जाधव, कल्पना पवार, ज्योती राठोड, राजेंद्र चव्हाण, कैलास राठोड, मधुकर राठोड व सेविका उपस्थित होत्या. माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी शिबिर यशस्वीपणे पार पडल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button