जळगाव शहर
भाजपा कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन
जळगाव लाईव्ह न्यूज। १७ ऑगस्ट २०२१ । भारतरत्न मा प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 16 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा व महानगर तर्फे भाजपा कार्यालय वसंत स्मृति येथे अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यारपन करण्यात आले. जिल्हा अध्यक्ष आ सुरेश भोळे, खा उन्मेश पाटील, व जि प अध्यक्षा रंजना पाटील, महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी आ सुरेश भोळे यांनी स्व अटल जिच्या कार्यांचा उजाळा दिला. यावेळी जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, आघाडीचे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थितीत होते