जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२१ । पेट्रोलियम कंपन्यांनी आज सलग २७ व्या दिवशी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. आज शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झाला नाही.त्यामुळे जळगावात आजचा एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.९८ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९७.०८ रुपये इतका झाला आहे.
जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढल्याने मागील दोन महिन्यात कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला होता. त्यामुळे देशभरातील अनेक शहरात पेट्रोलने १०० रुपयांची पातळी ओलांडली. डिझेल शंभरीच्या नजीक पोहोचले आहे. या दरवाढीने सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे कंपन्यांनी तूर्त इंधन दर जैसे थेच ठेवले आहेत.
जळगाव शहरात गेल्या ६ महिन्यापूर्वी २५ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोलचे दर ९३.४७ रूपये तर डिझेल ८२.५६ प्रति लिटर मिळत होते. त्यात जुलै २०२१ मध्ये प्रचंड वाढ झाली असून ६ महिन्यात पेट्रोलचे दर १५ रूपये ५१ पैशांनी तर डिझेलचे १४ रूपये ५२ पैसे प्रति लिटर वाढले आहेत.