चैतन्य तांडा येथे गरोदर महिलांचे लसीकरण
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२१ । कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीला लसीचा साठा उपलब्ध झाल्याने शिबिराचे आयोजन सकाळी करण्यात आले. यावेळी एकूण दहा गरोदर महिलांना कोव्हिशिल्ड लसीकरण करण्यात आले.
कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली असताना तिसऱ्या लाटेचा संकेत तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व सामान्यांबरोबर गरोदर महिलांचेही जास्तीत जास्त लसीकरण करण्यात यावे यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. याच पाश्र्वभूमीवर तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीला लसीचा साठा मंगळवार रोजी उपलब्ध झाल्याने येथील ग्रामपंचायतीत एकूण १० गरोदर व स्थनदा महिलांचे लसीकरण करण्यात आले. नियमांचे पालन करून यावेळी लसीकरण करण्यात आले.
या शिबिराप्रसंगी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, ग्रामसेवक कैलास जाधव, सदस्य गीता राठोड, अनिता चव्हाण, प्रवीण चव्हाण, संदीप पवार, वसंत राठोड, डॉ. घनश्याम राठोड, आरोग्य सेवक संदीप पाटील, आरोग्य सेविका ज्योती गांगुर्डे, आशा सेविका कविता जाधव, ज्योती राठोड व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी आभार मानले आहेत.