दूध संघातील याचिकेवर २० ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी
जिल्हा सहकारी दूध संघातील भरती प्रक्रिया सुरूवातीपासूनच वादाच्या भाेवऱ्यात सापडली आहे. दूध संघातील कर्मचारी भरतीविराेधात उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. या याचिकांवर शुक्रवारी कामकाज झाले. दूध संघातील याचिकांचे एकत्रिकरण (क्लब) करण्यात आले असून पुढील सुनावणी येत्या २० ऑगस्ट राेजी हाेणार आहे.
मुदत संपलेले संचालक मंडळ ही भरती काेणत्याही स्थितीत करायचीच असा चंग बांधून आहे. त्यामुळे अनेक तक्रारी करूनही प्रक्रिया राबविली जात आहे. या भरतीत काेणते उमेदवार भरती केले जातील याची यादी आधीच फुटल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. त्यानंतर संघाने एका खासगी एजन्सीमार्फत परीक्षा घेतली आहे. याबाबत जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील दूध उत्पादक संस्थेने याचिका दाखल केली आहे. दूध संघातील निवृत्त सुरक्षा अधिकारी एन. जे. पाटील यांनी भरती विराेधात जनहित याचिका दाखल केली आहे. इंटकतर्फेही भरतीविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे.