जळगाव लाईव्ह न्यूज | ५ ऑगस्ट २०२१ | जिल्ह्यात कोणत्याही पक्षाचे कोणताही मोठे नेते येतात तेव्हा त्यांच्यासमोर स्थानिक नेत्यांचा वाद किंवा टोलेबाजी होतच असते. गुरुवारी युवासेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई यांच्या समोर देखील मेहरूण तलावाच्या काठी एका पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये वाद झाल्याची चर्चा आहे.
पक्ष कोणताही असो नेत्यांसमोर वाद, टोमणेबाजी व्हायलाच हवी. ही जळगाव जिल्ह्याची एका प्रकारे प्रतिमाच बनली आहे. नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन आणि आताचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात वाद झाला होता. गेल्या वर्षी जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेसाठी जळगावात आले असता गुलाबराव देवकर यांच्यावर पाटील यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
गुरुवारी युवासेनेचे राष्ट्रीय सचिव वरूण सरदेसाई जिल्हा दौऱ्यावर आले होते. मेहरूण तलाव परिसरात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सरदेसाई यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी एक युवा कार्यकर्ता अतिशय उत्सुक होता. यावेळी तो भान हरवून फोटो खेचण्यासाठी इतरांना बाजूला सारत पुढे येत होते. यातच त्याचा धक्का सेनेच्या एका पदाधिकाऱ्याला लागला व त्यांनी त्याला उपदेशाचे डोस पाजले.