जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२१ । भडगाव तालुक्यात आमदार आपल्या गावी हे अभियान यशस्वीपणे राबवल्यानंतर पाचोरा तालुक्यात देखील हे अभियान लवकरच राबवले जाणार असल्याने त्याची पूर्व तयारीसाठी आ.किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली.बैठकीला तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे विभागप्रमुख अधिकारी कर्मचारी हजर होते.
यावेळी आमदार किशोर पाटील यांनी कोरोनासह सर्वच विभागाच्या कामांचा आढावा घेतला.महावितरणची वीज जोडणी, वसुली, पाणी पुरवठा योजनांचे विद्युत कनेक्शन आदी कामाचा आढावा घेतला तसेच विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातील बससेवा सुरळीत करणे, पोखरा योजनेची रखडलेली कामे त्वरित सुरू करणे, घरकुल योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, अतिक्रमित घरे नावावर करणे बाबत त्वरित मोजणी सुरू करणे, जवाहर विहिरिंचे विषय सोडवणे, तालुक्यातील नागरिकांना रेशन धान्याचा लाभ देण्यासाठी इष्टांक वाढवणे, नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे, जलजीवन मिशनची कामे प्रस्तावित करणे अशा अनेक कामांचा त्यांनी अधीकाऱ्यांकडून आढावा घेत आवश्यक त्या सूचना केल्या.
तसेच जनतेच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी प्रशासनाने एकदिलाने काम करून अधिकाऱ्यांमधील परस्पर संवाद वाढवण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनीही उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
बैठकीला नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी तालुका प्रमुख शरद पाटील, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील ,शहर प्रमुख कीशोर बारावकर, आमदारांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील, शिवसेनेचे प्रवीण ब्राह्मणे, तहसीलदार कैलास चावडे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील,तालुका कृषी अधिकारी बी बी गोर्डे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान वाघ ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता के जी शेलार, शाखा अभियंता पी टी पाटील ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जयंत महाजन, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता एन बी शेवाळे, महावितरणचे कार्यकारी अभियंता एस ए दासकर ,सहाय्यक निबंधक नामदेव सूर्यवंशी ,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे ,राकेश व्हणखंडे ,विजेंद्र निकम ,मानसी भदाणे ,नगररचना विभागाचे हेमंत क्षीरसागर ,पिंपळगाव पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायटे, पी एम जी एस वाय चे उपअभियंता रोहित पाटील ,गटविकास अधिकारी अतुल पाटील, भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक भोये यांचे सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते