जळगाव शहर

ठेकेदारांची मनमानी की महापौर, उपमहापौरांचे दुर्लक्ष

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२१ । महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभुषण पाटील रस्त्याची दुरूस्ती ही उत्कृष्ट दर्जाची व्हायला हवे अशी तंबी दिल्यानंतरही शहरातील ठेकेदार या दोघांच्या आदेशांना न जुमानता दर्जाची खड्डे बुजवण्याचे काम करत असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या आठवडाभरापूर्वी बुजवलेल्या खड्ड्यांमधील कच आणि खडी आता रस्त्यावर सर्वत्र पसरली आहे. यामुळे हे ठेकेदार नक्की जुमानता तरी कुणाला? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.

रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत होता. महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी रस्ते दुरुस्ती करण्याचे आदेश ठेकेदारांना दिले होते. ठेकेदारांनी रस्ते दुरुस्तीचा वेग वाढवला असला तरी त्या कामाची गुणवत्ता परखणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी बुजवण्यात आलेल्या खड्ड्यामधील खडी आता रस्त्यावर पसरली असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

६ कोटी ५० लाख रुपये पाण्यात जाणार?
महापौर भारती सोनवणे यांच्या कार्यकाळात जळगाव शहराचे रस्ते बुजवण्याचे नऊ कोटीचे टेंडर महापालिकेने काढले होते. मात्र तेव्हाही जळगाव शहराच्या रस्त्यांची अशीच दुर्दशा झाली होती. प्रत्येक प्रभागासाठी दिलेल्या कामांपैकी जवळपास ३ कोटींचे काम झाले असून त्या कामाचे पितळ उघडे पडू लागले आहे. शिल्लक साडेसहा कोटींची कामे आता होत असून ती देखील अशीच वाया जाणार का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button