राज मोहम्मद शिकलकर यांचा विविध संघटनांतर्फे सत्कार
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२१ । जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील राज मोहम्मद इस्माइल खान शिकलकर यांची जळगाव जिल्हा तंबाखू मुक्ती अभियान करीता ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती जळगाव जिल्हा शल्य चिकिस्तक जळगाव यांनी केल्याबद्दल त्यांचा जळगाव शहरातील विविध संघटनांतर्फे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख होते. आयोजक अल खैर ट्रस्टचे युसुफ शाह हे होते. सदर कार्यक्रम इस्लामपुरा येथील डॉ जावेद शेख यांच्या दवाखान्यात पार पडला.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सीकलगर बिरादरीचे अन्वर सीकलकर,अलहिंद ट्रस्टचे अल्ताफ शेख, सै नियाज अली फाऊंडेशनचे अयाज अली सैयद, कादरिया फाऊंडेशनचे फारुक कादरी, अनम सोसायटीचे सय्यद शाहिद, लहुजी बिग्रेडचे प्रदेश अल्पसंख्यांक अध्यक्ष शेर खान, काँग्रेस अल्पसंख्यांक महानगर अध्यक्ष अमजद पठाण,राष्ट्रवादीचे माजी जिल्हा अध्यक्ष मजहर खान, सुफी फाऊंडेशनचे हाजी शाकीर खाटीक, रोशनी फाऊंडेशनचे एडवोकेट अय्युब सीकलकर, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जमील खान, कुलजमाती चे डॉक्टर जावेद शेख, डॉ वसीम खान आदींच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.
यांची झाली समयोचित भाषणे
आयोजक युसुफ शहा यांनी प्रास्ताविका द्वारे राज मोहम्मद यांच्या कार्याचा आढावा सादर केला तर फारूक कादरी, अयाजअली सय्यद ,अमजद पठाण, मजहर खान यांनी सुद्धा राज मोहम्मद यांच्या कार्याचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात फारुक शेख यांनी राज मोहम्मद यांना तीन वर्षांपूर्वी त्यांच्या कार्याची दखल घेऊन शेख फाउंडेशन मार्फत मुंबई येथे होप पुरस्कार देऊन गौरव करण्यात आल्याचे नमूद करुन चोपडा येथील त्याच्या कार्याचे जिल्हाभरात नव्हे तर महाराष्ट्र भरात कार्य करण्यासारखे आहे असे नमूद करून त्यांच्या भावी योगदान व सहभागाकरिता शुभेच्छा देण्यात आले.
सत्काराला उत्तर
मला जीवदान मिळाले त्याचे चांगले यश दुसऱ्यांच्या जीवनात मिळवण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीत आहे व आपण मला बोलवा मी येईल व या व्यसनमुक्ती साठी आपणा सोबत प्रयत्न करेल असे आवाहन राजमोहम्मद यांनी सत्काराला उत्तर देतांना केले. कार्यक्रमाचे आभार अन्वर सिकलगर यांनी व्यक्त केले.