⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोऱ्यात शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रम

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोऱ्यात शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | २८ जुलै २०२१ | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा शहर शिवसेना,युवासेना व महिला आघाडीच्या वतीने शहरातील शिवभोजन केंद्रात मिष्ठान्न भोजन वाटप व फळ वाटप करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले.

पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे व्यथित झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले होते.त्यामुळे पाचोरा शिवसेनेच्या वतीने आयोजित पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करत ऐनवेळी फक्त पाचोरा शहरातील दोनही शिवभोजन केंद्रात मोतीचूर लाडूंचे वाटप, फळवाटप व शहरातील देशमुखवाडी भागातील खुल्या भूखंडात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख सुनीता पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, शहर प्रमुख किशोर बारावकर, माजी जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, भरत खंडेलवाल, पप्पू राजपूत, अशोक पाटील, सुमीत पाटील, आदित्य बिलदीकर, संदीप पाटील,प्रवीण ब्राह्मणे, किशोर निबाळकर, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, विशाल राजपूत, शुभम तेली, पप्पू जाधव, जय बारवकर,रोशन पाटील,शाकीर बागवान, प्रदीप पाटील, राहुल पगारे, चेतन मोरे, शरद पाटील,आकाश पाटील, राहुल महाजन, समाधान पाटील,महिला आघाडीच्या मंदाताई पाटील तालुकाप्रमुख, किरणताई पाटील, स्मिता बारवकर, बेबाबाई पाटील, चंदा ठाकरे, रेखा राजपूत, जया पवार, पद्मा पाटील यांची उपस्थिती होती

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.