⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | उपमहापौर गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांनी वापरलेली चारचाकी सापडली

उपमहापौर गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांनी वापरलेली चारचाकी सापडली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । शहर मनपाचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेली चारचाकी म्हसावद येथे सापडली असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही चारचाकी त्याच ठिकाणी उभी असल्याचे समजते.

शहर मनपाचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर किरकोळ वादातून हल्ला करीत गोळीबार करण्यात आला होता. कुलभूषण पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन उमेश पांडुरंग राजपूत व किरण शरद राजपूत या दोघांना अटक करण्यात आली आहे.

गुन्ह्यात हल्ला करण्यासाठी हल्लेखोरांनी चारचाकीचा उपयोग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गेल्या तीन दिवसांपासून म्हसावद गावाजवळ एक चारचाकी बेवारसपणे उभी होती. मंगळवारी एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी पाहणी केली असता चारचाकी क्रमांक एमएच.४८.एफ.१४२२ ही मिळून आली. चारचाकीच्या मागील बाजूला राणा राजपूत असे लिहिलेले असून पोलीस अधिक चौकशी करीत आहे. दरम्यान, याबाबत एमआयडीसी पोलिसांशी संपर्क केला असता सदर इनोव्हा उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर हल्ला करताना हल्लेखोरांनी वापरली असल्याचे त्यांनी सांगितले.

author avatar
Tushar Bhambare