जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । जळगाव सराफ बाजारात मागील तीन दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण झाली. अखेर आज शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरणीला ब्रेक लागला आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर चांदी देखील सलग दुसऱ्या दिवशी महागली आहे.
आज शुक्रवारी २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १५० रुपयाने तर २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १५० रुपयाने महागले आहे. तर चांदी ४०० रुपयाने महागली आहे. त्यापूर्वी काल २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ३६० रुपयाने स्वस्त झाले होते.
कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे सध्या सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. जळगाव सराफ बाजारात मागील तीन दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या तीन दिवसात सोने ७०० रुपयांहून अधिकने स्वस्त झाले होते. त्यामुळे सोने ४८ हजाराजवळ आले आहे.
दरम्यान, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे अनिश्चिततेच्या वातावरणात आणखी भर पडली असून यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याच्या किंमती 52 हजाराचा टप्पा गाठतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.
आजचा सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८१७ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८, १७० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४,५८८ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४५, ८८० रुपये आहे.
चांदीचा भाव
आज चांदी ४०० रुपयाने महागली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७२, ३०० रुपये इतका आहे.