कौटुंबिक कलह मोडायला आलेले पोलीस अधीक्षक कार्यालयात भिडले, दोघे रक्तबंबाळ
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२१ । पोलीस अधीक्षक कार्यालयात कौटुंबिक कलहात समझोता करण्यासाठी आलेल्या दोन कुटुंबात त्याच ठिकाणी तुफान हाणामारी झाली. रक्तबंबाळ अवस्थेत दोघांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत असे की, वाकोद येथील एका तरुणीचा विवाह औरंगाबाद जिल्ह्यात झाला होता. कौटुंबिक कलह सुरु झाल्यानंतर संबंधित तरुणीने जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयातील दक्षता समितीत तक्रार नोंदवली होती. त्यानुसार आज तारखेला दोन्ही गटातील मंडळी जमली. दक्षता समितीतील कामकाज आटोपल्यानंतर बाहेर पडल्यानंतर दोन्ही गटात शाब्दिक चकमक उडाली. त्यातून चांगलीच हाणामारी व्हायला सुरुवात झाली. या हाणामारीत फायटर सारख्या वस्तूचा देखील वापर झाला.
थोड्याच वेळात पोलिसांनी धाव घेत वाद मिटवला. परंतू या हाणामारीत तीन जण रक्तबंबाळ झालेत. सर्वांवर जिल्हा रुगणालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, सासरच्या मंडळीने आमच्या हल्ला केल्याचा आरोप पिडीत तरुणीने केला आहे.