⁠ 
सोमवार, जून 17, 2024

भावाच्या अंत्यविधीसाठी‎ गेलेल्या महिलेचे घर फोडले‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२१ । भावाचे निधन झाल्याने‎ अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेलेल्या‎ महिलेचे बंद घर फोडून चोरट्यांनी‎ डल्ला मारल्याची घटना गुजराल पेट्रोलपंप‎ परिसरातील देवरामनगरात शनिवारी ही‎ घटना उघडकीस आली आहे.

देवराम नगरात राहणाऱ्या वैशाली भिकन मराठे (वय ५२) यांच्या तळवेल‎ (वरणगाव) येथे राहणाऱ्या भावाचे‎ दि.२६ नोव्हेंबर रोजी निधन झाले.‎ यामुळे त्या तळवेल येथे गेल्या‎ ‎ होत्या. मधल्या काळात त्यांच्या बंद‎ घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत‎ प्रवेश केला. घरातील लोखंडी‎ कपाटाचे लॉकर तोडून ठेवलेले‎ सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा‎ एकूण १७ हजार ५०० रुपयांचा ऐवज‎ लंपास केला. हा प्रकार शनिवारी‎ सकाळी ६ वाजता उघडकीस‎ आला.

वैशाली मराठे यांनी दिलेल्या‎ फिर्यादीवरून तालुका पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात‎ आला. पुढील तपास अनिल फेगडे करीत‎ आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.‎