जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । जळगाव महानगरपालिकेतील राजकारण चांगलेच तापले असून नगरसेवक फुटीच्या भीतीने सत्ताधारी भाजप गोटात चांगलीच तारांबळ उडाली आहे. भाजपचे २० पेक्षा जास्त नगरसेवक शिवसेनेसोबत जात असल्याने सत्तानंतर होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यावरून माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी विरोधकांवर ‘घोडेबाजार’ सुरु असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, जळगाव मनपावर सेनेचा महापौर निवडून आणण्यासाठी शिवसेनेसह आघाडीकडून नवीन डाव खेळला जात आहे. भाजपचे २५ पेक्षा जास्त नगरसेवक तळाला लागले असल्याचे सेना नेत्यांनी स्पष्ट केले असल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. यावर आ. महाजन म्हणाले की, जे गेले आहेत ते परत येतील. पक्षा विरोधात काम केल्यास सहा वर्षाच्या निलंबनाची कारवाई अटळ आहे, असेही ते म्हणाले आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्यावर काही नगरसेवकांची नाराजी असल्याबाबत बोललं जात आहे. यावर बोलताना गिरीश महाजन की होय… काही लोकांची नाराजी असू शकते… सर्वांचेच समाधान नाही होऊ शकत.. नाराजी चालूच असते मग राजुमामा बद्दल असो किंवा माझ्याबद्दल… तिथे राजूमामा उभे नाहीत, पक्ष उभा आहे.
सत्ताधाऱ्यांकडे विकासाची दृष्टी नाही असा आरोप देखील होत आहे याबाबत स्पष्टीकरण देतांना आ. महाजन म्हणाले की विकासाचा मुद्दा नाहीच…आता अंडरग्राउंड ड्रेनेज झालेले आहे, पाणी पुरवठा योजना,100 कोटींच्या कामांची वर्क ऑर्डर झाली असून पुढील आठ पंधरा दिवसात कामे सुरु होतील त्यामुळे हा काही विषय नाही.
हे देखील वाचा:
महाजनांच्या ‘मैत्री’खातर ललित कोल्हे सेनेच्या वाटेवर!
आ.राजुमामा भोळेंमुळे फुटणार भाजप?
बिग ब्रेकिंग : जळगावात राजकीय उलथापालथ : माजी मंत्री आ.गिरीष महाजन मुंबई रवाना!