जळगाव जिल्हा

खरीपातील हंगामासाठी 31 ऑगस्टपर्यंत पाणी अर्ज करण्याचे आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जुलै २०२१ । कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांच्या पाण्याचा फायदा घेणारे बागाईतदारांना दि. 1 जुलै ते 14 ऑक्टोबर, 2021 या कालावधीकरीता सुरु होणाऱ्या खरीप हंगाम 2021 मध्ये भुसार/अन्नधान्न्ये/चारा/डाळी/ कपाशी/भुईमुग व इतर हंगामी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार अटी व शर्तींवर पाणी अर्ज सादर करण्याची मंजुरी देण्याचे ठरले आहे.

तरी बागाईतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात दिनांक 31 ऑगस्ट, 2021 पर्यंत सादर करावे. असे आवाहन कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button