खडकीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जुलै 8, 2021 4:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जुलै २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील खडकी बु. येथील ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी उघडकीस आली. प्रविण बिप्टा जाधव (वय-३५)  असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

crime

याबाबत असे की, खडकी बुद्रुक येथील प्रविण जाधव  याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहेत. दरम्यान, प्रवीण यास भाऊ विलास बिप्टा जाधव यांनी ग्रामीण रुग्णालयात मृत अवस्थेत दाखल केले. 

मयताचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नसून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना मुकेश पाटील हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now