“सौर ऊर्जा निर्मिती” ठरणार काळाची गरज ; डॉ. चेतनसिंग सोलंकी
जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जुलै २०२१ । ऊर्जा अर्थात विजेचे महत्त्व अनन्यसाधारण असून देशाच्या प्रगतीसाठी ऊर्जेची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु ऊर्जेची निमिर्ती व मागणी यामध्ये तफावत येत असल्यामुळे ऊर्जेचा सध्या मोठ्याप्रमाणात तुडवडा जाणवू लागला आहे. यावर काही अंशी मात करण्यासाठी ऊर्जेची बचत करणे व सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे अत्यंत आवश्यक आहे, असा मौलिक सल्ला रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागातील ऑनलाईन कार्यशाळेतील प्रमुख पाहूणे व आय.आय.टी. मुंबई येथील डॉ. चेतनसिंग सोलंकी यांनी दिला.
आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात ते पुढे म्हणाले कि, विद्युत ऊर्जा, पवन ऊर्जा या महागड्या दरात मिळणाऱ्या ऊर्जा आहेत. परंतु, सौर ऊर्जा मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. दिवसातील १२ तास सौर ऊर्जा आपल्या बरोबरच असते. उरलेल्या १२ तासांसाठी आपण सौर ऊर्जेची साठवण करून रात्रीच्या वेळी ती उपयोगात आणू शकतो. यासाठी खर्च सुद्धा अल्पप्रमाणात येतो. विद्युत ऊर्जा जेंव्हा अतिशय महत्त्वाची असते. त्या दिवशी मिळत नाही. परंतु सुर्यापासून मिळणारी ऊर्जा आपला दिवस व वेळ बदलत नाही.
म्हणून बदलत्या काळानुसार आपण जास्तीत जास्त प्रमाणत सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यास शिकले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सदर ऑनलाईन कार्यशाळेचे नियोजन प्रा. प्रफुल्ल देसले, प्रा. मनीष महाले, व प्रा. गणेश सोनवणे व रेसा कमिटी यांनी केले. तर आभार इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. बिपासा पात्रा यांनी मानले. तसेच या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या नियोजन केल्याबद्दल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री . प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक इंजिनिअरिंग डीन प्रा. डॉ. क्रिष्णकुमार पालीवाल यांनी कौतुक केले