जळगाव जिल्हा

गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळी उत्साहात ; चिमुकल्यांनी लुटला आनंद!

प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे प्राचार्य नीलिमा चौधरी यांचे आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी दिवाळीच्या विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत सणाचा आनंद लुटला.दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाश आणि आपुलकीचा सण. या सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत शाळेत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. रंगीबेरंगी सजावट, पणत्या आणि दिवाळीच्या आनंददायी वातावरणामुळे शाळा उजळून निघाली.याप्रसंगी शाळेच्या प्राचार्य नीलिमा चौधरी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश दिला. फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनीप्रदूषण टाळून सर्वांनी प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच दिवाळीच्या आनंदात निसर्गाची आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सणाविषयी उत्साह निर्माण होण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजविण्यात आली. आनंद, उत्साह आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देत गोदावरी इंग्लिश स्कूलमधील दिवाळी उत्सव उत्साहात संपन्न झाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button