सोने - चांदीचा भाव

जळगावच्या सुवर्णपेठेत सोने-चांदीचे भाव धडाम! आज किती रुपयांची घसरण? पाहा नवीन भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२६ । दिवाळीचा सण जवळ आल्याने सोने आणि चांदी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे. अशातच मागच्या काही दिवसापासून सुरु असलेली घसरण आज देखील कायम राहिली. जळगावच्या सराफ बाजारात आज मंगळवारी, २७ ऑक्टोबर रोजी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात २०० रुपयांची, तर चांदीच्या दरात २ हजार रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला. Gold Silver Rate Today

सोन्याच्या दरात २०० रुपयांची घसरण

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात आज २०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे जीएसटीसह १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ४६ हजार ५४ रुपयांवर आला आहे. दिवाळी आणि सणासुदीच्या काळात सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दरातील ही घसरण महत्त्वाची ठरत आहे.

चांदीही २ हजारांनी स्वस्त

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घट झाली आहे. चांदीच्या दरात २ हजार रुपयांची घसरण झाल्याने जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव २ लाख २ हजार ९१० रुपयांवर आला आहे. चांदीचे दागिने, पूजेच्या वस्तू आणि इतर चांदीच्या वस्तू खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना या दरबदलाचा फायदा होऊ शकतो.

भारतीय संस्कृतीत सोने आणि चांदीला विशेष महत्त्व आहे. दिवाळी, धनत्रयोदशी तसेच लग्नसराईच्या काळात या मौल्यवान धातूंच्या खरेदीला विशेष पसंती दिली जाते. त्यामुळे सराफ बाजारातील दरांमधील चढ-उताराकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, जळगावच्या सराफ बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली असली, तरी पुढील काळात दरांमध्ये पुन्हा बदल होऊ शकतात. प्रत्यक्ष खरेदी करताना दागिन्यांची घडणावळ, लागू कर आणि संबंधित सराफाच्या विक्रीदरानुसार अंतिम किंमत वेगळी असू शकते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button