जळगाव जिल्हाभुसावळरेल्वे

प्रवाशांना दिलासा ! जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ विशेष गाड्या नोव्हेंबरअखेरपर्यंत धावणार

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव, भुसावळ मार्गे धावणाऱ्या आणखी काही गाड्यांच्या फेऱ्यांत वाढ करण्यात आली आहे. दिवाळी सुट्ट्यांच्या काळात रेल्वे प्रवाशांची गर्दी आणि वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने विविध मार्गांवर धावणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांना नोव्हेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे पुणे, नागपूर, अमरावतीसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पुणे–अमरावती, अमरावती–पुणे, नागपूर–हडपसर, हडपसर–नागपूर तसेच मुंबई–नागपूर मार्गावरील काही विशेष एक्स्प्रेस गाड्यांच्या फेऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

या गाड्यांच्या वाढीव फेऱ्या २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत निर्धारित तारखांपर्यंत सुरू राहणार आहेत. मुदतवाढ मिळालेल्या गाड्यांमध्ये ०१४०३ पुणे–अमरावती एक्स्प्रेसला २४ नोव्हेंबरपर्यंत, तर ०१४०४ अमरावती–पुणे एक्स्प्रेसला २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तसेच ०१२०१ नागपूर–हडपसर एक्स्प्रेस २६ नोव्हेंबरपर्यंत आणि ०१२०२ हडपसर–नागपूर एक्स्प्रेस २७ नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. याशिवाय ०१२०९ नागपूर-हडपसर एक्स्प्रेस आणि ०२१३९ सीएसएमटी–नागपूर एक्स्प्रेसच्या फेऱ्या २८ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहतील. तर ०१२१० हडपसर–नागपूर एक्स्प्रेस आणि ०२१४० नागपूर–सीएसएमटी एक्स्प्रेसला २९ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रवाशांनी संबंधित गाड्यांचे वेळापत्रक, थांबे आणि आरक्षणाची उपलब्धता तपासून प्रवासाचे नियोजन करावे. गाड्यांच्या फेऱ्या व आरक्षणासंदर्भातील अद्ययावत माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा आरक्षण प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या विशेष गाड्यांच्या विस्तारित फेऱ्यांमुळे ऐन दिवाळीच्या हंगामात गावी जाणाऱ्या किंवा परतीच्या प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button