जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कबड्डी व खो-खो स्पर्धेत घवघवीत यश

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत जळगाव विभागाच्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी व खो-खो स्पर्धा आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिरपूर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगावच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

अंतिम सामन्यात एस.व्ही.के.एम., दहिवड संघाविरुद्ध २४-२९ गुणांनी पराभव झाल्यामुळे महिला संघाने द्वितीय क्रमांक पटकावत रौप्यपदक मिळवले. खो-खो स्पर्धेत पुरुष व महिला अशा दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले. पुरुषांच्या गटात अंतिम सामन्यात आर.सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाचा १०-०० गुणांनी पराभव करून पुरुष संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले.महिला खो-खो संघाने त्यानंतर अंतिम सामन्यात एस.एस.बी.टी. महाविद्यालय, बांभोरी संघाला ०८-०२ गुणांनी पराभूत करून प्रथम क्रमांक पटकावला.

या यशस्वी खेळाडूंचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव तसेच सर्व विभागप्रमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या मेहनतीचे, सांघिक भावनेचे आणि क्रीडाकौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील(सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button