जळगाव जिल्हा

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

जागतिक हात धुणे दिनानिमित्त स्वच्छतेचे महत्त्व व गरजू कुटुंबांना स्वच्छता साहित्याचे वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । जागतिक हात धुणे दिनाचे औचित्य साधून रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिट, जळगाव यांच्या वतीने एमआयडीसी परिसरातील पंढरपूर नगर, विणूज वर्ल्ड जवळील काठियावाडी भागात हँडवॉश जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून परिसरातील गरजू व वंचित कुटुंबांमध्ये वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.या मोहिमेदरम्यान परिसरातील नागरिकांना आणि बालकांना हात धुण्याची योग्य पद्धत, दैनंदिन स्वच्छतेचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैलीसाठी स्वच्छतेच्या सवयींची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुण्याची सवय लावल्यास अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते, याबाबतही नागरिकांना माहिती देण्यात आली.नागरिकांना स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने मोहिमेदरम्यान जीवनावश्यक स्वच्छता साहित्याचे वाटप करण्यात आले. समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचून आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरला.स्वच्छतेच्या साध्या सवयींमधून निरोगी समाज घडविण्याचा संदेश देणार्‍या या मोहिमेचे परिसरातून स्वागत करण्यात आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button