गुन्हेजळगाव शहर

जळगावात चोरट्याने किराणा दुकान फोडले; नोटांसह तब्बल १.१६ लाखांची चिल्लर लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच शहरातील विसनजी नगरात बंद दुकानाचे शटर रॉडने उचकवून दुकानातून रोख १ लाख ७५ हजार २५० रुपये चोरट्यांनी चोरून नेले. चोरीच्या या रकमेत १ लाख १६ हजार २५० रुपयांची चिल्लर आहे.या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यावसायिक मयूर पुरुषोत्तम मंडोरे (४१, रा. गणपती नगर) यांचे विसनजी नगरमध्ये मयूर ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान आहे. ६ ऑक्टोबर रोजी पहाटे हे दुकान बंद असताना चोरट्यांनी रॉडने शटर उचकवून दुकानात प्रवेश केला. त्या वेळी दुकानातून एकूण १ लाख ७५ हजार २५० रुपयांची रोकड चोरून नेली.

यात ५९ हजार रुपयांच्या वेगवेगळ्या दराच्या नोटा आहेत. तर ३१ हजार २५० रुपयांची ५ रुपये मूल्याची ४ बॅग नाणी, ५ हजार रुपयांची १ रुपया मूल्याची १ बॅग नाणी,४० हजार रुपयांची १० रुपये मूल्याची ४ हजार नाणी, ४० हजार रुपयांची २० रुपये मूल्याची २ हजार नाणी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मयूर मंडोरे यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तपास पोहेकॉ. गणेश शिरसाळे करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button