जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या फलकनाज शेखचे वुशू स्पर्धेत सुवर्णपदक

राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी फलकनाज आसिफ शेख हिने विभागीय आंतरशालेय वुशू स्पर्धा २०२६ अंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळविले.

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत फलकनाज हिने आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. तिच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

फलकनाजच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी तिचे अभिनंदन केले. आगामी स्पर्धांसाठी तिला शुभेच्छा देत आणखी उत्तुंग यश संपादन करण्यासाठी प्रोत्साहित केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही तिचे अभिनंदन केले

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button