
विभागीय स्पर्धेसाठी नाशिक येथे निवड
जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळच्या विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धा २०२६ मध्ये शाळेचा विद्यार्थी आदित्य राजेंद्र सोनवणे याने अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत प्रथम स्थान मिळविले.आदित्यच्या अचूक नेमबाजी, एकाग्रता आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
या यशामुळे त्याची आगामी विभागीय स्तरावरील रायफल शूटिंग स्पर्धेसाठी नाशिक येथे निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. सौ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी त्याचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.आदित्यच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





