
गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा उपक्रम
जळगाव लाईव्ह न्यूज । विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील औद्योगिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि शिक्षण व उद्योग क्षेत्रातील दरी कमी व्हावी, या उद्देशाने गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे ङ्गइंडस्ट्रियल अॅप्रोच इन इलेक्ट्रॉनिक्स’ कार्यशाळा’ या विषयावर तीन दिवसीय प्रत्यक्ष कृतीसह सराव कार्यशाळा घेण्यात आली. दि. २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान आयोजित या कार्यशाळेस इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास केंद्र, नाशिक यांचे सहकार्य लाभले.

कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कोअर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक घटक, सेमीकंडक्टर उपकरणे, पॉवर इलेक्ट्रॉनिक मॉड्यूल्स, ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रिकल मशीन,आयसीएस, मायक्रोकंट्रोलर तसेच विविध औद्योगिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध इलेक्ट्रॉनिक घटक हाताळणे, सर्किटची अंमलबजावणी, उपकरणांची ओळख, औद्योगिक उपयोग तसेच इलेक्ट्रॉनिक सर्किटमधील त्रुटी शोधण्याच्या पद्धतींचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेतले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील संकल्पना प्रत्यक्ष औद्योगिक उपयोगाशी जोडण्यास मदत झाली. तसेच उद्योगाभिमुख तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यासोबत आधुनिक उद्योगांच्या गरजांनुसार व्यावहारिक कौशल्ये व आत्मविश्वास वाढण्यास हातभार लागला.
कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. सचिन महेश्री यांनी नियोजन व आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले. सूत्रसंचालन राजश्री यादव यांनी केले. विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. महेश एच. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी कार्यशाळेस मार्गदर्शन व सहकार्य केले.यावेळी राजश्री यादव, कृष्णा पाथोड, आदित्य पवार, उर्वशी पाटील, सोनम गुरिजाल, अंजली जोगी, श्रेयोनी चोपडे, दिव्या फाके, प्रगती चौरे, हर्षल खरचे, ओम राणे, ओम इचलकर, चेतन माळी, तेजस्विनी उगले, दीपिका परदेशी, कल्याणी शिंदे व तन्मय पाटील या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.





