गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव

सप्टेंबर 26, 2026 4:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे द्वितीय यंत्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक 24 सप्टेंबर 2026 रोजी औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना वर्गखोलीतील सैद्धांतिक ज्ञानाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष औद्योगिक प्रक्रिया, उत्पादन तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, गुणवत्ता नियंत्रण आणि औद्योगिक कार्यपद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.

GCE 1

या औद्योगिक भेटीअंतर्गत विद्यार्थ्यांनी किरण मशीन टूल्स, जळगाव या स्प्रिंग उत्पादन करणाऱ्या उद्योगाला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्प्रिंग निर्मितीच्या विविध प्रक्रिया व उत्पादन तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती घेतली. उत्पादन अभियांत्रिकी, मटेरियल प्रोसेसिंग आणि मशीन टूल्स यासंबंधीच्या अभ्यासक्रमातील संकल्पनांचा प्रत्यक्ष औद्योगिक प्रक्रियांशी संबंध जोडण्यास या भेटीचा मोठा फायदा झाला.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी हिमालय कोल्ड स्टोरेज, जळगाव येथे भेट देऊन कोल्ड स्टोरेजची कार्यपद्धती, रेफ्रिजरेशन प्रणाली, तापमान नियंत्रित साठवणूक आणि औद्योगिक मटेरियल हँडलिंग याबाबत माहिती घेतली. कृषी व अन्नपदार्थांच्या सुरक्षित साठवणुकीमध्ये थर्मल इंजिनिअरिंग आणि रेफ्रिजरेशन तंत्रज्ञानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजले.

यानंतर आर.जे. फूड्स, जळगाव येथे विद्यार्थ्यांनी Parle-G बिस्किट निर्मिती प्रक्रियेचे निरीक्षण केले. उत्पादन, प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, पॅकेजिंग आणि मटेरियल हाताळणी यांसारख्या विविध टप्प्यांची विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये अभियांत्रिकी तत्त्वे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशाप्रकारे केला जातो, याची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जाणीव झाली.

या संपूर्ण औद्योगिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी उद्योगातील तज्ज्ञांशी संवाद साधत सुरक्षितता, उत्पादकता, गुणवत्ता नियंत्रण, प्रक्रिया नियोजन, देखभाल आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर यांचे महत्त्व समजून घेतले. या औद्योगिक भेटीसाठी डॉ. के. एम. महाजन (समन्वयक) आणि डॉ. पंकज बोंडे यांनी विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहून त्यांना मार्गदर्शन केले.

या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष औद्योगिक उपयोग यांच्यातील दुवा समजून घेण्यास मदत झाली. प्रत्यक्ष उद्योगविश्वाचा अनुभव घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर पडली तसेच भविष्यातील व्यावसायिक क्षेत्राविषयी त्यांची समज अधिक व्यापक झाली.

सदर उपक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ. वर्षा पाटील मॅडम (सचिव), डॉ. केतकी पाटील मॅडम (सदस्य), डॉ. वैभव पाटील सर (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील सर यांनी कौतुक केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now