डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

सप्टेंबर 24, 2026 3:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे दि. १४ ते २० सप्टेंबर २०२६ दरम्यान ‘फिजिओ गणेशा’ गणेशोत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा व मनोरंजनात्मक उपक्रमांनी उत्सव साजरा करतांना जनजागृती करण्यात आली.

New Project 4 2

दि. १४ सप्टेंबर रोजी श्री गणेशाची विधिवत स्थापना करून उत्सवाला सुरुवात झाली. पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या सहभागाने आरती करण्यात आली. दि. १५ रोजी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अंतर्गत क्रीडा दिनाचे आयोजन केले. संगीत खुर्ची, कागदी नृत्य, फुग्याचा समतोल, रस्सीखेच आदी खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.दि. १६ रोजी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी खजिना शोध, रॅम्प वॉक आणि फॅशन शो आयोजित केला. दि. १७ रोजी सत्यनारायण पूजा, महाप्रसाद, आरती व भजनाचा कार्यक्रम झाला.

दि. १८ रोजी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘न्यूरो निंजा’, अंताक्षरी व विविध मनोरंजक खेळ घेतले. दि. १९ रोजी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी भजन स्पर्धा व कार्यपूर्ती खेळांचे आयोजन केले.दि. २० सप्टेंबर रोजी आरतीनंतर गणेशमूर्तीची भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली. *‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’*च्या जयघोषात बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.या उत्सवामुळे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचार्‍यांमध्ये एकता, सांघिक भावना, सहकार्य आणि आपलेपणा वृद्धिंगत झाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now