जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे गणेशोत्सव स्पर्धोंतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि बौद्धिक क्षमतेला वाव तसेच संस्कृती आणि परंपरेची ओळख होण्यासाठी सांस्कृतिक जागर करण्यात आला.

.१५ सप्टेंबर रोजी रांगोळी स्पर्धा, १६ सप्टेंबर रोजी प्रश्नमंजुषा, १७ सप्टेंबर रोजी क्ले मॉडेलिंग (माती शिल्पकला) आणि १८ सप्टेंबर रोजी पोस्टर मेकिंग स्पर्धा घेण्यात आल्या. यात पारंपारीक गणेशोत्सव व सांस्कृतिक विषयांचा समावेश करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील आकर्षक रांगोळ्या, कल्पक मातीशिल्पे आणि संदेशपर पोस्टर साकारत आपल्या कलात्मक व सर्जनशील कौशल्याचे दर्शन घडविले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचे आणि बौद्धिक क्षमतेचे प्रदर्शन केले. या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला १९ सप्टेंबर रोजी विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना, नेतृत्वगुण आणि कलात्मक अभिव्यक्ती विकसित होण्यास प्रोत्साहन मिळाले. स्पर्धांचे आयोजन प्रा. अश्विनी माणकर यांच्या नेतृत्वाखाली सह.प्रा.स्नेहल जांभुळकर, सह.प्रा दिवायना, सह.प्रा मंजिरी मडावी, सह.प्रा प्राजक्ता सावकार,सह.प्रा सुरज खवाटे आणि सह.प्रा सुमित भारंबे यांनी केले.उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या डॉ. विशाखा गणवीर तसेच अध्यापकवृंदाने विद्यार्थी व आयोजकांचे अभिनंदन केले.गणेशोत्सवानिमित्त आयोजित या उपक्रमांमुळे महाविद्यालयात उत्साह, सर्जनशीलता आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले.






