जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

सप्टेंबर 17, 2026 5:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी संगीत महाविद्यालय जळगावने स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमीत्त ‘गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा आयोजित करण्याची परंपरा यावर्षी देखील पाळली जाणार असून यंदाच्या वर्षी ही स्पर्धा रविवार दि २७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजीत केली आहे. या स्पर्धेचे यंदाचे हे २९ वे वर्ष असून विविध वयोगटांतील हौशी गायक-गायिकांना व्यासपिठ उपलब्ध होवून अनेक गायक कलाकार या स्पर्धेने दिले आहे. नाव नोंदणीला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून राज्यभरातून स्पर्धेक सहभागी होत असतात.

godavari sangit

स्पर्धेसाठी बाल गट, किशोर गट आणि प्रौढ गटात ही स्पर्धा घेतली जाते. बाल गटात इयत्ता १ ली ते ६ वी, किशोर गटात इयत्ता ७ वी ते १२ वी, तर प्रौढ गटात ४० वर्षांपर्यंतचे स्पर्धक सहभागी होऊ शकतात. स्पर्धेत प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक, गोदावरी करंडक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतेे. प्रौढ गटात प्रथम क्रमांकासाठी अनुक्रमे २००१ व्दीतीय १५०१,आणि तृतीय १००१ रुपये, तर किशोर गटात प्रथम १५०१, द्वितीय १००१ व तृतीय ७०१, आणि बालगटात प्रथम १००१,व्दीतीय ७०१ तर तृतीय क्रमांकासाठी ५०१, रुपये अशी पारितोषिके आहेत. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धा दि २७ रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार असून त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर केला जाणार आहे. किशोर व प्रौढ गटासाठी मराठी चित्रपटांतील भावगीते व गझल सादर करता येतील. बाल गटासाठी बालगीते व भावगीते ग्राह्य धरली जातील.स्पर्धा केवळ हौशी कलाकारांसाठी असून व्यावसायिक तसेच आकाशवाणी मान्यताप्राप्त कलाकारांना प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक स्पर्धकाला एकच गीत सादर करता येईल आणि गीताचे दोनच अंतरे सादर करण्याची परवानगी असेल. असे आयोजकांनी कळविले आहे.इच्छुक स्पर्धकांनी प्रवेश अर्जाची झेरॉक्स प्रत सादर करावी. अधिक माहितीसाठी गोदावरी संगीत महाविद्यालय, गोदावरी हॉस्पिटल, भास्कर मार्केटजवळ, जळगाव येथे संपर्क साधावा. संपर्क क्रमांक ९८५०० ७५६५१, ९९२१९९ ६९७४ असे आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now