जळगावात कापूस खरेदीला सुरुवात ; पहिल्याच दिवशी मिळाला इतका भाव?

सप्टेंबर 15, 2026 2:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी कापूस खरेदीचा नारळ फुटला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. धरणगाव येथे पहिल्याच दिवशी कापसाला तब्बल ८,५५३ रुपये तर पारोळा तालुक्यातील करमाड येथे ८,३५१ रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

cotton jpg webp

धरणगावात श्रीजी जिनिंगमध्ये काटा पूजन

धरणगाव येथील श्रीजी जिनिंग येथे मोठ्या उत्साहात काटा पूजन करून कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा लीलाबाई चौधरी, डी. आर. पाटील, बाळासाहेब चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती पी. सी. पाटील, उद्योजक भगवान महाजन, बाजार समितीचे सभापती प्रेमराज पाटील, संचालक सुरेश चौधरी, जीवनसिंह बयस, नयन गुजराथी, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, भानुदास विसावे आणि पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

करमाड खुर्द येथे शेतकरी सन्मानित

पारोळा तालुक्यातील करमाड खुर्द येथेही गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. बाजार समितीच्या संचालक बबिता पाटील यांचे पती संभाजी जिभाऊ पाटील यांच्या हस्ते काटा पूजन झाले. येथे कापसाला ८,३५१ रुपये प्रतिक्विंटलचा दर देण्यात आला. याप्रसंगी गावातील शेतकरी प्रवीण जुलाल पाटील, जिभाऊ धनराज पाटील, वसंत साहेबराव पाटील, परमेश्वर मुकुंदा पाटील व गणेश ठाकूर यांच्या कापसाची पहिली मोजणी करून खरेदी करण्यात आली. एन सणाच्या काळात कापसाला चांगला भाव मिळाल्याने बळीराजा समाधान व्यक्त करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now