पाचोरा तालुक्यात अवैध मद्यविक्रीविरोधात मोठी कारवाई; २२५ बनावट दारूच्या बाटल्या जप्त

ऑगस्ट 16, 2026 9:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाचोरा तालुक्यात मोठी कारवाई केली. पाचोरा रोडवरील कुरंग्याच्या बाजाराजवळ सापळा रचून एका पांढऱ्या रंगाच्या टाटा इंडिका कारची तपासणी केली असता त्यातून बनावट देशी मद्याचे तब्बल २५ बॉक्स, म्हणजेच २२५ बाटल्या आढळून आल्या. या कारवाईत सुमारे १४ हजार ४०० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.

pcdr

गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कुरंग्याच्या बाजाराजवळ संशयित वाहनावर पाळत ठेवली होती. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये बनावट देशी मद्याचा साठा आढळून आला. त्यानंतर कारसह चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी पाचोरा व जळगाव परिसरातील चार जणांचा समावेश असल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे. वाहन, बनावट मद्य आणि इतर साहित्य असा मुद्देमाल विभागाने ताब्यात घेतला असून, संबंधित संशयितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले असून, अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now