अमळनेर पोलिसांचे धडक ‘कोंबिंग ऑपरेशन’; गावठी पिस्टल, तलवारीसह अवैध धंद्यांवर मोठी कारवाई!

जुलै 30, 2026 12:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२६ । कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमळनेर पोलिसांनी शहरात व परिसरात व्यापक कोंबिंग ऑपरेशन राबवत विविध गुन्ह्यांवर धडक कारवाई केली. या विशेष मोहिमेत बेकायदेशीर शस्त्रे जप्त करण्यापासून दारूबंदी, जुगार, वाहतूक नियमभंग आणि प्रलंबित वॉरंट बजावणीपर्यंत अनेक कारवाया करण्यात आल्या. या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले.

aml 1

या कोंबिंग ऑपरेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर पोलीस ठाण्याचे ७ अधिकारी व ६२ अंमलदार, तसेच स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) जळगावचे १ अधिकारी व १० अंमलदार सहभागी झाले होते.

कारवाईदरम्यान आर्म ॲक्ट अंतर्गत पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एक आणि तलवार बाळगल्याप्रकरणी आणखी एक अशी दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. दारूबंदी कायद्यांतर्गत ९, तर जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ५ गुन्हे दाखल करण्यात आले.

दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या ११३ संशयितांची चौकशी करून त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तसेच २५ हिस्ट्रीशीटरांची तपासणी करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या ३२ जणांवर मुंबई पोलीस कायदा कलम ११२/११७ अन्वये कारवाई करण्यात आली.

याशिवाय कोटपा कायद्यांतर्गत ३, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८५ अंतर्गत ७, मोटार वाहन कायद्यांतर्गत ३६, एमव्ही ॲक्ट कलम ६६/१९२ अंतर्गत १, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविल्याप्रकरणी ३ आणि मॉडिफाईड (मोसा) सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनांवर २ कारवाया करण्यात आल्या.

मोहिमेदरम्यान ६ बेपत्ता महिलांचा शोध घेण्यात आला. तसेच १५ अजामीनपात्र (NBW) वॉरंट, ६ जामीनपात्र (BW) वॉरंट आणि २१ समन्सची अंमलबजावणी करण्यात आली. शहरातील १६ हॉटेल व लॉजेसची तपासणीही करण्यात आली.

याशिवाय भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२६/१२९ अन्वये २० आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, अशा धडक मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now