पदवीधरांना सरकारी बँकेत नोकरीचा चान्स; ५४५ जागांसाठी भरती, पगार ८५,९२०..

जुलै 25, 2026 3:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ने लोकल बँक ऑफिसर पदांसाठी ५४५ रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये महाराष्ट्रासाठी ६७ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे.

PNB Bank

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रोसेस सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटती तारीख ९ ऑगस्ट २०२६ आहे. यामध्ये ऑनलाइन परीक्षा ऑगस्ट किंवा सप्टेंबर २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक पात्रता :

तुम्ही या पदासाठी अर्ज करणाऱ्या करत असाल तर तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी पूर्ण असायला हवी. अर्जदाराचं वय १ जुलै २०२६ रोजी २० ते ३० वर्षे दरम्यान असायला हवे. सरकारी नियमांनुसार SC/ST, OBC आणि दिव्यांग उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. या भरतीसाठी अनुसूचित व्यावसायिक बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत किमान एक वर्षाचा लिपिक किंवा अधिकारी म्हणून अनुभव असायला हवा. महाराष्ट्रातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे अनिवार्यच असेल. दहावी किंवा बारावीत मराठी विषय नसलेल्या उमेदवारांना स्थानिक भाषा प्राविण्य परीक्षा (LLPT) द्यावी लागेल.

परीक्षा शुल्क :

SC/ST/PwBD उमेदवारांसाठी ५९ रुपये GST सहित आणि इतर सर्व उमेदवारांसाठी १,१८० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

इतका पगार मिळेल?

निवड झालेल्या उमेदवारांना ₹४८,४८० ते ₹८५,९२० या वेतनश्रेणीसह महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय सुविधा आणि इतर भत्ते मिळणार आहेत. सर्व भत्ते मिळून मासिक पगार १ लाखांपेक्षा जास्त होऊ शकतो.

उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी, आवश्यक असेल तर स्थानिक भाषा प्राविण्य परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अंतिम गुणवत्ता यादी लेखी परीक्षा आणि मुलाखतीतल्या गुणांच्या मदतीने तयार केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Recruitment या विभागातून ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now