जळगाव सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दराने घेतली उसळी ; वाचा आजचे नवीन दर?

जुलै 21, 2026 4:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीमुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार दिसून येत असून अशातच आज पुन्हा एकदा जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दराने उसळी घेतली आहे.

gold rate 2

आज जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात १ हजार २०० रुपयांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. या भाववाढीमुळे आता GST सह सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४७ हजार २९० रुपयांवर पोहोचला आहे. ऐतिहासिक उच्चांकाकडे वाटचाल करणाऱ्या या दरांमुळे सोन्याची खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र आहे.

सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरानेही ग्राहकांना झटका दिला आहे. आज चांदीच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली असून, आता १ किलो चांदीचा भाव GST सह तब्बल २ लाख ३१ हजार ७५० रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारातील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मागणी आणि आर्थिक अनिश्चिततेचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होत असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दररोज होत असलेल्या चढ-उतारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, अनेक जण दर स्थिर होण्याची प्रतीक्षा करत आहेत.

दरम्यान, लग्नसराई आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांतही दरांमध्ये चढ-उतार कायम राहू शकतात, असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now