जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि गैरसोयीची बातमी आहे. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेलाही मोठा फटका बसला असून आवश्यक रेक (रेल्वे गाडी) उपलब्ध होऊ न शकल्यामुळे आज गुरुवार, दिनांक ९ जुलै रोजी दोन्ही बाजूंनी धावणाऱ्या भुसावळ-दादर (खान्देश) एक्स्प्रेस गाड्या पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत. ऐनवेळी गाड्या रद्द झाल्यामुळे दोन्ही बाजूच्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रेक (रेल्वे गाडी) उपलब्ध नसल्यामुळे गुरुवार, दि. ९ रोजी दोन्ही बाजूकडून धावणाऱ्या भुसावळ-दादर (खान्देश) एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

गाडी क्र. १९००३ भुसावळ-दादर एक्स्प्रेस, तर गाडी क्र. १९००४ दादर-भुसावळ एक्स्प्रेस या गाड्या दि. ९ रोजी पूर्णतः रद्द राहील, संबंधित गाड्यांसाठी आवश्यक रेक उपलब्ध नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे रेल्वेने कळविले आहे.
लिकिंगमुळे गाडी रद्द
भुसावळ-दादर एक्स्प्रेस या गाडीला दादर पोरबंदर ही गाडी लिंक आहे. सध्या अतिवृष्टीमुळे पोरबंदर गाडी बंद आहे. त्यामुळे रेकच उपलब्ध नसल्याने खान्देशासाठी असलेली भुसावळ – दादर गाडी रद्द करण्यात आली आहे.








