अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान ; माजी आ. राजाराम महाजन

जुलै 4, 2026 3:51 PM

माजी आ. राजाराम (गणू) महाजन महादेव हॉस्पिटलला सदिच्छा भेट

जळगाव लाईव्ह न्यूज । महादेव हॉस्पीटलमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान ठरत असल्याचे माजी आमदार राजाराम (गणू) महाजन यांनी जळगाव येथील महादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला सदिच्छा भेटीत केले.

rajaram mahajan

यावेळी त्यांच्यासोबत गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील तसेच रुग्णालयातील इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित डॉक्टरांनी महादेव हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक निदान यंत्रणा, हृदयरोग उपचार, शस्त्रक्रिया सुविधा, अतिदक्षता विभाग, आपत्कालीन सेवा तसेच रुग्णकेंद्रित उपचार पद्धतीची माहिती महाजन यांना दिली.महाजन यांनी रुग्णालयातील स्वच्छता, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, डिजिटल आरोग्य सेवा आणि अनुभवी डॉक्टरांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.

उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना महानगरांमध्ये न जाता दर्जेदार व आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महादेव हॉस्पिटलचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.महादेव हॉस्पिटलमध्ये विविध सुपरस्पेशालिटी सेवा, हृदयरोग उपचार, शस्त्रक्रिया, अत्याधुनिक निदान सुविधा तसेच शासकीय आरोग्य योजनांअंतर्गत उपचार उपलब्ध असून रुग्णांना दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.महानगरातील सुविधा जळगाव शहरातच आणि योजनेअंतर्गत मिळत असल्याने नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन देखिल त्यांनी यावेळी केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now