⁠ 
रविवार, मे 19, 2024

सोनं स्वस्त, तर चांदी महाग ; जाणून घ्या आजचे जळगावातील ताजे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ ।   गेल्या मागील दोन तीन आठवड्यात सोन्याच्या दरात अनेक चढउतार पाहायला मिळाले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोने ५६२०० रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेले होते. मात्र जानेवारीपासून त्यात मोठी घसरण झाली. दरम्यान, आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदी महागली आहे. आज सोन्याचा दर प्रति दहा ग्रम ११० रुपयांनी स्वस्त झालं आहे. परंतु चांदी १०० रुपयाने वाढली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाच्या तुलनेत डॉलरचा भाव वधारल्याने त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर पाहायला मिळत आहे. जळगाव सराफ बाजारात मागील गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोने दर ४८ हजाराच्या आत आले आहे. 

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,७४९ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,४९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५२३ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४५,२३० रुपये आहे.

 चांदीचा भाव

तर आज चांदीच्या भावात १०० रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७३,५०० रुपये इतका आहे.

केंद्र सरकारने 16 जूनपासून देशभरात हॉलमार्क असलेल्याच सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जाईल, हा नियम लागू केला होता. मात्र, या नियमाची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर ग्राहक अजूनही हॉलमार्क असलेल्या दागिन्यांच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील मोठ्या जिल्ह्यांमधील सर्व सराफी पेढ्यांमध्ये फक्त सोन्याची शुद्धता प्रमाणित केलेले (हॉलमार्क) दागिने उपलब्ध होण्यासाठी अजून किमान दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

‘या’ शहरांमध्ये हॉलमार्किंग बंधनकारक

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, अकोला, अमरावती, धुळे, लातूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, नागपूर, पालघर, रायगड, अहमदनगर व सोलापूर या 22 जिल्ह्यांमध्ये सराफांना हॉलमार्कचे दागिने विकणे बंधनकारक आहे.