सोने - चांदीचा भाव

घसरणीला ब्रेक ! जळगावात आज सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ, खरेदीपूवी तपासून घ्या नवीन दर?

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२६ । मागील दोन तीन दिवसापासून सोन्यासह चांदी दरात मोठी घसरण दिसून आली. मात्र आता या घसरणीला ब्रेक लागला असून आज शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच सोने-चांदीत मोठी दरवाढ झाल्याचं दिसत आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या १ तोळ्याच्या किंमतीत २,९४० रुपयांनी तर चांदीच्या किमतीत १०,००० रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना झटका बसला आहे.

GoodReturns ने दिलल्या माहितीनुसार काल सोन्याच्या दरात घसरण झाली होती. पण आज जळगाव सराफा बाजार उघडताच यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळतेय. आज सकाळी २४ कॅरेट सोने दरात २९४० रुपयांची वाढ होऊन ते १,४८,५८० रुपयावर पोहोचले आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत १,१८,८६४ असून यात २३५२ रुपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १,३६,२०० रुपये आहे. त्यात आज २७०० रुपयाची वाढ झाली आहे

आज चांदीची १ ग्रॅमची किंमत २६० रुपये आहे. यामध्ये १० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम चांदीची किंमत २,०८० रुपये आहे. यात आज ८० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळतेय. १० ग्रॅम चांदीची किंमत २,६०० रुपये आहे. यामध्ये १०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १००० ग्रॅम चांदीची किंमत ही २,६०,००० रुपये असून यात १०,००० रूपयांनी वाढ झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button