खरेदीची सुवर्णसंधी! जळगावात सोने दरात ३८००, तर चांदी ११,३०० रुपयांनी घसरली; पाहा ताजे दर

जून 10, 2026 3:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२६ । सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफा बाजारात बुधवारी मोठी घसरण नोंदविण्यात आली. आज सकाळी सोन्याच्या दरात ३८०० रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल ११,३०० रुपयांची घट झाली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. Gold Silver Rate Today

gold silver 1 jpg webp

एकीकडे इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकीय आणि आर्थिक घडामोडींना वेग आला आहे. या तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळत असतानाच, दुसरीकडे मात्र मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. Gold Silver Price Today

सोन्याचे दर

जळगाव सराफ बाजारात काल मंगळवारी १,२३६ रुपयांच्या वाढीसह २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५६,२५१ रुपये (जीएसटीसह) वर पोहोचला होता. मात्र आज बुधवारी सकाळी बाजार उघडताच सोन्यात ३,८११ रुपयांची मोठी घसरण झाली. यानंतर २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १,५२,४४० रुपये इतका झाला आहे.

चांदीचे दर

दुसरीकडे काल मंगळवारी चांदीचा दर जीएसटीसह प्रति किलो २,५६,४७० रुपये या विक्रमी पातळीवर स्थिर होता.आज बुधवारी सकाळी बाजार सुरू होताच चांदी तब्बल १०,३०० रुपयांनी स्वस्त झाली. आता चांदीचा दर ३ टक्के जीएसटीसह २,४६,१७० रुपये प्रति किलोवर खाली आला आहे.

किमती कमी होताच जळगावच्या सराफा बाजारात ग्राहकांनी दागिने खरेदीसाठी एकच गर्दी केली आहे. लग्नघटिका आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर ही घसरण ग्राहकांच्या खिशाला दिलासा देणारी ठरली आहे. मात्र, ही घसरण तात्पुरती आहे की बाजारात ही घसरण अशीच कायम राहणार, याकडे आता मोठे गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांचे बारीक लक्ष लागून राहिले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now