मंत्री गिरीष महाजनांच्या वाढदिवसानिमित्त ‘महादेव हॉस्पिटल’ ठरले जीवनसंजीवनी!

मे 20, 2026 4:57 PM

हृदयरोग शिबिरात २५ रुग्णांवर तातडीचे उपचार; तीनच दिवसांत ५० हून अधिक रुग्णांची तपासणी

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव हॉस्पीटलमध्ये हृदयरोग मुक्त जिल्हा अभियानांतर्गत भव्य हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हॉस्पिटलच्या तत्पर व अत्याधुनिक हृदयरोग विभागामुळे अनेक रुग्णांसाठी हे हॉस्पिटल जीवनसंजीवनी ठरत आहे.

MahadevGM

मंत्री गिरीष महाजन यांनी वाढदिवस सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमांनी साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महादेव हॉस्पीटलचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी पुढील एक महिनाभर हृदयरोग तपासणी शिबिर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या शिबिरामध्ये नागरिकांसाठी २डी इको, ईसीजी, एन्जिओग्राफी तसेच एन्जिओप्लास्टी संदर्भात मोफत तपासणी व तज्ज्ञांचा सल्ला उपलब्ध करून देण्यात आला आहे.

दररोज सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू असलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच ५० हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, अनेक रुग्णांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, योजनेअंतर्गत २५ रुग्णांवर तातडीने मोफत उपचार करण्यात आले असून, योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.प्रसिद्ध डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी हृदयरोग तज्ज्ञांची टीम मनोभावे सेवा देत आहे.

आधुनिक वैद्यकीय सुविधा, अचूक निदान आणि तत्पर उपचार यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आधार मिळत आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात आकाशवाणी चौक येथे सुरू असलेल्या महादेव हॉस्पीटलमध्ये विविध आजारांवरील योजना व कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित डॉक्टरांची टीम आणि रुग्णसेवेची तळमळ यामुळे हे हॉस्पीटल अल्पावधीतच नागरिकांचा विश्वास संपादन करत आहे.रुग्णांना वेळेत उपचार मिळून त्यांना नवजीवन मिळणे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहर्‍यावर समाधान पाहणे, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे, असे मत हॉस्पीटलचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी व्यक्त केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now