खरेदीदारांना दिलासा ! चांदी दरात तब्बल 10000 रुपयाची घसरण, सोने..; पहा आजचे भाव

एप्रिल 21, 2026 12:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२६ । सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असून सोन्या-चांदीच्या दागिन्यांना मोठी मागणी आहे. मात्र, सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. सोन्याचे दर प्रति तोळा दीड लाखांच्या पार पोहोचल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच, आज बाजारातून एक संमिश्र बातमी समोर आली आहे.

Silver

सोन्याचे दर स्थिर

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत होते. मात्र, आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोन्याचे दर स्थिर राहिल्याने खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी किमती उच्चांकी स्तरावर असल्याने ग्राहकांनी सध्या ‘वाट पाहा आणि मगच खरेदी करा’ अशी भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे.

चांदीच्या दरात मोठी घट

सोन्याचे दर स्थिर असले तरी चांदीने मात्र ग्राहकांना दिलासा दिला आहे. आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज चांदी दर १०००० रुपयांनी घसरून २,६५,००० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. चांदी स्वस्त झाल्यामुळे ज्यांना लग्नानिमित्त चांदीची भांडी किंवा दागिने खरेदी करायचे आहेत, अशा ग्राहकांसाठी ही चांगली संधी मानली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now