लग्नसराईत ग्राहकांना दिलासा! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण

एप्रिल 13, 2026 12:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२६ । सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने बाजारपेठेत सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात वाढलेल्या सोन्याच्या दराने खरेदीदारांच्या चिंतेत भर घातली होती; मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३८० रुपयांनी कमी झाले आहेत. Gold Silver Rate Today

gold silver rate jpg webp

२४ कॅरेटचे दर

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३८० रुपयांनी घसरून १,५२,४६० रुपयावर पोहोचले आहे. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ३०४ रुपयांनी घसरले असून १,२१,९६८ रुपये झाले आहेत.

२२ आणि १८ कॅरेटचे दर

२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३५० रुपयांनी घसरले असून हे दर १,३९,७५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं २८० रुपयांनी स्वस्त झालं असून हे दर १,११,८०० रुपये झाले आहेत. सोबतच आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २९० रुपयांनी घसरले असून १,१४,३४० रुपये झाले आहेत.

चांदीचा दर

दुसरीकडे आज चांदी दरातही मोठी घसरण झाली आहे. आज सोमवारी सकाळी चांदी दरात प्रति किलो ५००० रुपयापर्यंतची घसरण झाली आहे. यामुळे आता चांदीचा एक किलोचा दर २,५५,००० रुपयावर पोहोचला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now