एकाच दोरीला गळफास घेऊन दाम्पत्याने संपविले जीवन; चाळीसगातील हृदयद्रावक घटना

मार्च 29, 2026 4:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे एका दाम्पत्याने एकाच दोरीला गळफास घेऊन आत्म#$ हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भगवान पोपट जाधव (वय ३८) आणि आशाबाई भगवान जाधव (वय-२७) अशी मृतांची नावे असून, त्यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

shivapur

नेमकी घटना काय?

शिवापूर शिवारात राहणाऱ्या जाधव दांपत्याने घरापासून अवघ्या ३०० फूट अंतरावर असलेल्या आपल्या स्वतःच्या शेतात हे टोकाचे पाऊल उचलले. शेतातील एका उंबराच्या झाडाला एकाच दोरीच्या सहाय्याने दोघांनी गळ#$ फास घेतला. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने दोघांना खाली उतरवून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.

मृत जाधव दांपत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. विशेष म्हणजे, ही दोन्ही मुले शिक्षणासाठी गावाबाहेर राहत असल्याने घटनेच्या वेळी ती घरी नव्हती. परंतु दोघांच्या आत्म#$हत्येमुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्म#$हत्येचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण सपकाळे हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now