जळगावात उद्यापासून दोन दिवस ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार

मार्च 23, 2026 5:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव व व वा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव ग्रंथोत्सव २०२६ चे आयोजन मंगळवार व बुधवार, दि. २४ व २५ मार्च रोजी करण्यात आले आहे. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवात पुस्तक प्रदर्शन, विक्री तसेच विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे.

granthtsov

ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, दि. २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार असून, कार्यक्रमाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे ,राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थीत राहणार आहे.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी “कालानुरूप बदलती वाचनसंस्कृती” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.

दुसऱ्या दिवशी, २५ मार्च रोजी “AI आणि मराठी भाषा” या विषयावर परिसंवाद होणार असून, या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान आणि मराठी भाषेतील संधी व आव्हाने यावर चर्चा केली जाणार आहे. याशिवाय कवीसंमेलन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हा ग्रंथोत्सव व. वा. वाचनालय, स्टेशन रोड, जळगाव येथे होणार असून, सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ज्ञानोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now