पाचोऱ्यातील बायपास भरधाव ट्रक पलटला ; चालक जखमी

मार्च 19, 2026 5:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२६ । ​पाचोरा शहरातील बायपास रोडवर आज १९ मार्च रोजी दुपारी भीषण अपघात झालाय. दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रक इलेक्ट्रिक पोलला धडकून पलटी झाल्याने चालक जखमी झाला असून मोठी जीवितहानी टळली आहे.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

काय आहे घटना?

भडगावकडून पहूरकडे जाणारा ट्रक (क्रमांक MH 19 CX 4699) पाचोरा येथील बायपासवरून जात असताना अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले. वेग जास्त असल्याने ट्रक दुभाजकावरील इलेक्ट्रिक पोलला आदळून विरुद्ध दिशेला पलटी झाला.

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. कारण ऑईलने भरलेला ट्रक उलटल्यामुळे परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता होती. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत चालकाला सुरक्षित बाहेर काढले. चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, बायपास रस्त्यावर जड वाहनांची मोठी वर्दळ असूनही अनेक चालक वेगमर्यादा पाळत नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रण अधिक कडक करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now