भादलीतील तरुण शेतकऱ्याचा तापी नदीत बुडून मृत्यू

जून 21, 2021 9:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । जळगाव तालुक्यातील भादली खुर्द येथील तरुण शेतकऱ्याचा तापी नदीच्या काठी गुरे चारतांना पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दुपारी घडली. सुधाकर बाबुलाल सोवनणे (वय-३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime

याबाबत असे की, भादली खुर्द येथील सुधाकर सोवनणे  हे आज दुपारी आपल्या त्यांच्या शेतात गुरे चारण्यासाठी गेले होते. यावेळी तापी नदीत त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. दरम्यान त्यांच्या ते बुडाल्याचे पाहून आजूबाजूच्या नागरीकांनी आरडाओरड केली. परंतु त्यांचा यात बुडून मृत्यू झाला. 

त्यांचा शोध सुरु असतांना एक किलामीटर अंतरावर भोकर शिवारात तापी नदीत त्यांचा मृतदेह मिळून आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पुढील तपास पो.हे.कॉ. ईश्वर लोखंडे, आर.के. राठोड हे करीत आहेत. 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now