जळगाव लाईव्ह न्यूज | जळगावमधील नवउद्योजक आणि प्रस्थापित व्यावसायिकांच्या प्रगतीला वेग देण्यासाठी ए.पी. कन्सल्टंट्स अँड इंजिनिअर्स एलएलपी मार्फत विशेष ‘बिझनेस सेमिनार’ आयोजित करण्यात आले आहे. हा सेमिनार बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगाव शहरातील वा. वा. वाचनालय हॉलमध्ये पार पडणार आहे.

सरकारी योजना आणि पाठबळ अनेकदा भांडवलाअभावी किंवा योग्य माहितीअभावी चांगले व्यवसाय मागे पडतात. सरकारकडून एमएसएमई (MSME) क्षेत्रासाठी अनेक अनुदान योजना आणि विनातारण कर्ज उपलब्ध असते, परंतु त्याची तांत्रिक माहिती सामान्य उद्योजकांपर्यंत पोहोचत नाही. या सेमिनारच्या माध्यमातून ‘ए.पी. कन्सल्टंट्स’ या योजनांचा मार्ग सुलभ करून देणार आहेत.

या सेमिनारमध्ये व्यवसायाचा विस्तार कसा करावा, शासकीय योजनांचा प्रभावी वापर कसा करावा, तसेच उद्योगाच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक बाबी यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणारे उद्योजक तसेच आधीच कार्यरत असलेल्या व्यावसायिकांसाठी हा सेमिनार अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
सेमिनारमध्ये बिझनेस हेल्थ टेस्टच्या माध्यमातून सहभागींच्या व्यवसायाची सध्याची स्थिती तपासण्यात येणार आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध अनुदान (Subsidy) योजना, कर्जसुविधांबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे. यासोबतच उद्योगांच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक असलेल्या झेड (ZED) प्रमाणपत्राबाबतही तज्ज्ञांकडून माहिती देण्यात येणार आहे.
या सेमिनारसाठी प्रवेश शुल्क १५०० रुपये ठेवण्यात आले असून, त्यामध्ये चहा, दुपारचे जेवण आणि हाय-टीचा समावेश आहे.नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी 8956159407, 8956159404, 9156044824 या क्रमांकांवर संपर्क साधावा.
ए.पी. कन्सल्टंट्स अँड इंजिनिअर्स एलएलपी ही संस्था जळगावसह पुणे, मुंबई आणि दिल्ली येथे कार्यरत असून, उद्योग व व्यवसाय विकासासाठी विविध सेवा पुरवत आहे. त्यामुळे जळगावातील उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.











